Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

ईव्हीएममध्ये बिघाड


मुंबई - तांत्रिक बिघाड, हवामानातील आर्द्रता अशी अनेक कारणे लक्षात घेत निवडणूक आयोगाकडून अतिरिक्त मशिन्सची सोय करण्यात आली होती. त्यामुळे ईव्हीएममध्ये बिघाड झाला असला तरी कुठेही गैरसोय झाली नाही असा दावा निवडणूक विभागाकडून करण्यात आला आहे. दरम्यान वरळी बावन्न चाळ येथील मतदान केंद्र क्रमांक ६२ मध्ये मतदान मशीन वारंवार बंद पडल्याने शेकडो लोकांना मतदानापासून वंचित राहावे लागले. यामुळे याठिकाणी पुन्हा मतदान घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.  
 
आज सकाळी दहाच्या सुमारास वरळीतील मतदानकेंद्र क्रमांक ६२ येथील ईव्हीएम मशीन बंद पडली. एकामागोमाग सहा मशीन बदलल्यानंतरही मतदान होऊ शकले नाही. या ठिकाणी आलेले मतदार त्रस्त होऊन निघून गेले. दुपारच्या दरम्यान मतदान प्रक्रिया पुन्हा व्यवस्थित सुरू करण्यात आली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. तर धारावीतील ट्रान्झिट कॅम्पमधील एका मतदानकेंद्रात तर कलिना येथील सात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला त्यावेळी काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवण्यात आले. त्यामुळे उर्वरित मतदान सुरळीतपणे पार पडले. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत अठरा बॅलेट युनिट, अठरा कंट्रोल युनिट, शंभर व्हीव्हीपॅट बदलून तातडीने नविन मशीन देण्यात आल्या. त्यानंतर मतदान सुरळीत सुरू झाले. मतदान प्रक्रियेत कोठेही अडथळा निर्माण झाला नाही,' अशी माहिती मुंबई शहर जिल्हा माध्यम कक्षाकडून मिळाली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom