Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड


मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत आज बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. जयंत पाटील यांनीच त्यांचं विधीमंडळ नेतेपदी नाव सूचवलं. त्यांच्या नावाला धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह सर्व नेत्यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली. 

निवडीनंतर अजित पवार यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपला टोला लगावला. पहिल्यांदा सरकार स्थापन करणाऱ्यांना दिवाळी गोड खाता आली नाही असं ते म्हणाले. आम्ही निवडणुकीतील कामावर खूश आहोत. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारे आनंदी नाहीत, असं ते म्हणाले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं ५४ जागा जिंकल्या आहेत. पक्षाच्या अनेक आमदारांनी निवडणुकीआधी आणि प्रचारादरम्यान भाजपची वाट धरली असली तरी, राष्ट्रवादी या निवडणुकीत तिसरा मोठा पक्ष ठरला आहे. भाजपनं १०५ जागांवर विजय मिळवला असून, शिवसेनेनं ५६ जागा जिंकल्या आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom