हक्काचे पैसे परत द्या अन्यथा तीव्र आंदोलन - पीएमसी बँक खातेदार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

30 October 2019

हक्काचे पैसे परत द्या अन्यथा तीव्र आंदोलन - पीएमसी बँक खातेदारमुंबई - पीएमची बँकेचे राष्ट्रीयकृत बँकेत विलिनीकरण करा व आमच्या हक्काचे पैसे परत द्या अशी जोरदार मागणी करीत पीएमसी बँकेच्या खातेदारांनी बुधवारी आझाद मैदानात आंदोलन केले. आरबीआयकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने खातेदार आक्रमक झाले आहेत. खातेदारांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास रास्तारोको करण्याचा इशारा खातेदारांनी दिला आहे. आंदोलनात ठेवीदार व गुरुव्दाराचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

पीएमसी बँकेचा घोटाळा समोर आल्यानंतर आरबीआयने निर्बंध आणले आहेत. लाखो खातेदारांचे पैसे अडकल्याने अनेकांना दिवाळी साजरी करता आली नाही. याच्या निषेधार्थ मंगळवारी शेकडो खातेदारांनी आरबीआय समोर निदर्शन करून मुख्य महाव्यवस्थापकांना निवेदन सादर केले. मात्र आतापर्यंत कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याने बुधवारी शेकडो खातेदारांनी पुन्हा आझाद मैदानात आंदोलन केले. बँकेचे जवळपास १७ लाख ठेवीदार असून त्यांचे पैसे अडकल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आतापर्यंत पाच ठेवीदारांनी आत्महत्या केली आहे. बँकेत पैस अडकल्याने ते पैसै परत मिळण्याची ठोस आश्वासन मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल झाले आहेत. आतापर्यंत सरकारने अनेक बँकांना मदत केली आहे. मात्र सहकारी बँकांच्या ठेवीदारांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवाल पीएमसी बँक ठेवीदार असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास उठगी यांनी केला आहे. खातेदारांनी विचारला आहे. ठेवीदारांचे १०० टक्के पैसे परत मिळावे यासाठी बँकेचे राष्ट्रीयकृत बँकेत विलिनीकरण करावे अशी मागणी खातेदारांची केली आहे. मात्र आरबीआयकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याने खातेदारांनी संताप व्यक्त केला. बुधवारी आझाद मैदानात शेकडो खातेदारांनी बँकेचे विलिनकरण करून आमच्या हक्काचे पैसे परत द्या अशा जोरदार घोषणा देऊन बुधवारी आझाद मैदान दणाणून सोडले. सरकारने प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष केल्यास रास्तारोको करण्याचा इशाराही ठेवीदारांनी दिला आहे.
सरकारने तातडीने निणर्य घ्यावा - 
पीएमसी बँकेवर निर्बंध आल्याने अनेकांना दिवाळी साजरी करता आलेली नाही. गुरुनानक जयंती १४ दिवसावर आली आहे. ही जयंती साजरी करावयाची आहे. परंतु सर्व पैसे बँकेत अडकल्यामुळे ती साजरी करण्यास अडचण येत आहे. सरकारने तातडीने निणर्य घ्यावा अशी मागणी खातेदारांनी केली.

Post Top Ad

test