रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत त्यांनाच सफलता मिळते - रामदास आठवले - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

16 October 2019

रिपब्लिकन पक्ष ज्यांच्यासोबत त्यांनाच सफलता मिळते - रामदास आठवले


मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष मी जिवंत ठेवणार आहे. रिपाइंची शाखा मुंबई पासून दिल्ली, आसामपर्यंत देशभर उभारण्यात आल्या आहेत. राज्यात रिपाइंची निर्णायक ताकद आहे. रिपाइं ज्यांच्या सोबत त्यांना निवडणुकीत सफलता मिळते आणि ज्यांच्या विरोधात रिपाइं काम करते त्यांचा सत्यनाश होतो. असा टोला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे नाव न घेता काँग्रेसला लगावला.

मुलुंड पश्चिम येथे भाजप शिवसेना रिपाइं महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या प्रचार सभेत आठवले बोलत होते. यावेळी खासदार मनोज कोटक, नगरसेविका रजनी केणी, रिपाइंचे काकासाहेब खंबाळकर, अंबर केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी कुस्ती खेळण्याची गरज नाही. येत्या 24 तारखेला निवडणूक निकाल लागणार आहे. त्या निकालात स्पष्ट होईल की निवडणूकीचा फड महायुतीचेच पहेलवान जिंकतील असे आठवले म्हणाले. 

डॉ. आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत एक मूल्य अशी समता संविधानातुन आणली. संविधान सर्वश्रेष्ठ आहे. मोदी सरकार संविधानाच्या बाजूचे आहे. पण काँग्रेस सरकार विरुद्ध अपप्रचार करीत आहेत. असे सांगत जोपर्यंत मी सरकार मध्ये आहे तोपर्यंत संविधानाला, आरक्षणाला हात लावू देणार नाही असा ईशारा ना. रामदास आठवले यांनी दिला.

शिवशक्ती भीमशक्ती ऐक्य मी घडविले आहे. त्यातुन सामाजिक एकजूट होत आहे. समाजात परिवर्तन होत आहे. थोड्या लोकांच्या डोक्यात जातीवादाचे विष आहे. जातिवादातून दलितांवर अत्याचार होत आहेत. अत्याचारांविरुद्ध रिपाइं संघर्ष करीत आहे असे आठवले म्हणाले.

Post Top Ad

test