Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा


मुंबई - खड्डेमय रस्त्यांची तक्रार अद्याप कायम असताना मुंबई महापालिकेने मात्र खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा ही योजना सुरु केली आहे. १ नोव्हेंबरपासून ही योजना सुरु होत आहे.

मुंबईतील रस्त्यावर कोट्यवधी रुपयाचा खर्च करूनही अल्पावधीतच रस्ते खड्डेमय होतात. खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधीचे कंत्राट दिले जाते, मात्र तरीही अनेक ठिकाणी खड्डे बुजलेले नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. मुंबईकर खड्डेमय रस्त्यांनी त्रासलेले आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात शहरातील रस्त्यांवर फक्त ४१४ खड्डे असल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला होता. मात्र नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विरोधी पक्षांनी हा दावा खोटा ठरवला. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांसंबंधी महापालिकेच्या 'MCGM 24x7' अॅपवर हजारो तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन अनेक खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र मुंबईतील अनेक रस्त्यांवर अजूनही खड्डे कायम असल्याची स्थिती आहे. दरम्यान, खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी खड्डे दाखवा ५०० रुपये मिळवा ही नवीन योजना आणली आहे. १ नोव्हेंबरपासून या योजनेला प्रांरभ होत आहे. त्यामुळे मुंबईत खड्डा दाखवणा-या मुंबईकरांना पालिका प्रशासनाकडून ५०० रुपये मिळणार आहेत.

अशा असणार अटी-शर्ती -
- मुंबईकरांनी दाखवलेला कमीतकमी खड्डा १ फुट लांब आणि ३ इंच खोल पाहिजे.
- तक्रारीनंतर २४ तासांत खड्डा भरला गेला तर पैसे मिळणार नाहीत.
- खड्डे दाखवा, पैसे मिळवा या योजनेसाठी My BMC pothole fixlt या अॅप वर जाऊन खड्ड्यांची तक्रार नोंदवावी लागेल.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom