Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पीएमसी बँकेला बेल आउट पॅकेज देऊन बुडण्यापासून वाचवावे - संजय निरुपम


मुंबई - केंद्र व राज्य सरकारने पंजाब नॅशनल बँकेला बेल आउट पॅकेज (केंद्र व राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत) देऊन बुडण्यापासून वाचवले होते, तशाच प्रकारे पीएमसी बँकेला देखील १० हजार करोड रुपयांचे बेल आउट पॅकेज देऊन बुडण्यापासून वाचवावे अशी मागणी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष व माजी खासदार संजय निरुपम यांनी केली.

आरबीआयने पीएमसी बँकेवर निर्बंध घातल्यामुळे १६ लाख खातेधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही लोकांना मानसिक धक्का बसला, काही लोकांना हार्ट अटॅक आला आहे. सर्व खातेधारक हवालदिल झाले आहेत. म्हणून आमची आरबीआयकडे अशी मागणी आहे की, ज्यावेळेस निरव मोदी व मेहुल चोक्सी करोडो रुपयांचा घोटाळा करून पळाले, त्यावेळेस त्यांना कर्ज देणारी पंजाब नॅशनल बँक बुडीत निघाली होती त्यावेळेस त्या बँकेला बुडण्यापासून वाचविण्याकरिता ज्या प्रकारे केंद्र व राज्य सरकारने बेल आउट पॅकेज देऊन बँकेला बुडण्यापासून वाचवले होते. तशाच प्रकारे, आज तशीच परिस्थिती ओढवलेल्या पीएमसी बँकेला, जरी ती सहकारी बँक असली तरीदेखील त्यांच्यासाठी बेल आउट पॅकेज सरकारने जाहीर करावे. केंद्र व राज्य सरकारने या बँकेसाठी १० हजार करोड रुपयांचे बेल आउट पॅकेज देऊन या बँकेला वाचवावे, अशी मागणी माजी खासदार व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज केली. आज पीएमसी बँकेच्या खातेधारकांच्या एका शिष्टमंडळासोबत संजय निरुपम यांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील आरबीआय बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापक उमा शंकर व या बँकेचे तपासणी अधिकारी, यांची भेट घेतली व पीएमसी बँकेच्या खातेधारकांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळेस ते बोलत होते.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, आम्ही आज आरबीआय मुख्य महाव्यवस्थापकांकडे मागणी केली आहे की, त्यांनी पीएमसी बँकेसाठी बेल आउट पॅकेज जाहीर करून पीएमसी बँकेला वाचवावे व त्यातील खातेधारकांचे पैसे सुरक्षित करावेत. तसेच ६ महिन्यांमध्ये फक्त १० हजार रुपये काढण्याचा खातेधारकांवर जो निर्बंध घातलेला आहे. तो काढून टाकावा. कारण आजच्या महागाईमध्ये फक्त १० हजार रुपयांमध्ये हे खातेधारक आपले घर कसे चालवणार. हे सर्व खातेधारक आज त्रासलेले आहेत. त्यांना स्वतःच्या पैशाची सुरक्षिततेबाबत खात्री वाटत नाहीत. त्यामुळे हा निर्बंध आरबीआयने रद्द करावा. अशी आमची आरबीआयकडे मागणी आहे.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की, त्यांनी विधानसभेसाठी जागावाटप, युतीचा फॉर्मुला, निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी आणि राजकारण हे सर्व बाजूला ठेऊन पीएमसी बँकेच्या खातेधारकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात व पीएमसी बँकेला केंद्र व राज्य सरकारकडून ताबडतोब बेल आउट पॅकेज मिळवून देऊन पीएमसी बँकेच्या खातेधारकांची जमा रक्कम सुरक्षित करावी आणि ही बँक वाचवावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom