Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

घाटकोपरमध्ये शिवसैनिकांची उघड बंडखोरी


मुंबई - शिवसेना-भाजप युती झाल्यानंतर घाटकोपर पश्चिममधून भाजपचे विद्यमान आमदार राम कदम यांनाच उमेदवारी देण्यात आली. मात्र, त्यांच्या नावाला शिवसेनेतून तीव्र विरोध होत आहे. विशेषत: स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नावावर तीव्र नाराजी असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राम कदम यांना मतच देणार नसून मनसेला मत देणार असल्याचं इथल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी जाहीर केलं आहे. तसे बॅनरच घाटकोपरमध्ये लावण्यात आले आहे.

या बॅनरवर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी खुलं पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये ‘आमचं मत यावेळी राज ठाकरेंच्या मनसेला’ असं नमूद करण्यात आलं आहे. राम कदम यांनी मागील वर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याचा राग घाटकोपरमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. हेच कारण त्यांनी राम कदम यांना विरोध करण्यासाठी या बॅनरमध्ये नमूद केलं आहे.

माननीय उद्धवसाहेब, जय महाराष्ट्र! किरीट सोमय्याने तुमच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. आपण त्याला सेना-भाजप युतीची उमेदवारी मिळू दिली नाही. तेव्हा आम्हाला आपला खूप अभिमान वाटला! आणि महिलांचा अपमान करणाऱ्या राम कदमला कोणत्याच पक्षाने उमेदवारी देऊ नका, अशी आपली ठाम भूमिका होती. पण आज भाजपने युतीची घाटकोपरची उमदेवारी त्याला दिली. साहेब, माफ करा. यावेळी भाजपला मतदान नाही. आमचं मत राज ठाकरेंच्या मनसेला !!!

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom