गौतम सोनवणे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार


मुंबई - रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आणि मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप रिपाइं रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार गौतम सोनवणे हे उद्या शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महायुतीचे प्रमुख नेते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे उपस्थित राहणार आहेत. तसेच स्थानिक खासदार मनोज कोटक यांना ही रिपाइं तर्फे निमंत्रित करण्यात आले आहे.

शिवाजी नगर मुख्य जंक्शन येथील भीमवाडी मधील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीने रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष आणि भाजप शिवसेना रिपाइं रासप महायुती चे अधिकृत उमेदवार म्हणून गौतम सोनवणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवाजी नगर मुख्य जंक्शन भीमवाडी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व रिपाइं महायुती च्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षातर्फे अधिकृत करण्यात आले आहे.
Previous Post Next Post