चुकीचा एक्झिट पोल दाखवणाऱ्या मीडिया एजन्सींनी माफी मागावी - थोरात - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

25 October 2019

चुकीचा एक्झिट पोल दाखवणाऱ्या मीडिया एजन्सींनी माफी मागावी - थोरात


मुंबई - निवडणुकीपूर्वी मीडियाने दाखविलेले सर्व एक्झिट पोल खोटे ठरले आहेत. त्यांनी जे उमेदवार पराभूत होणार म्हणून दिवसभर सांगितलं, ते उमेदवार ५० हजार ते लाखाचं मताधिक्य घेऊन जिंकले आहे. त्यामुळे मीडियाला सर्व्हे करून देणाऱ्या या एजन्सींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला एक्झिट पोलचा सर्व्हे करून देणाऱ्या एजन्सींवर टीका केली. यावेळी त्यांनी जनमताचा कौल मान्य असल्याचं सांगतानाच विरोधी पक्ष म्हणून आम्ही जबाबदारीने काम करू, असं त्यांनी सांगितलं. मतदानाच्या आदल्या दिवशी एक्झिट पोल दाखवण्यात आले. हे सर्व एक्झिट पोल चुकीचे होते हे सिद्ध झाले आहे. मतमोजणीच्या आदल्या दिवशी काही उमेदवार पराभूत होणार म्हणून मीडियाने जाहीर केलं. ज्या उमेदवारांनी ५० हजारांपासून ते लाखापर्यंतचं मताधिक्य घेतलं तेही पराभूत होणार असल्याचं या एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात येत होतं. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, अमित देशमुख आणि मी सुद्धा पराभूत होणार म्हणून एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येत होतं. मीडियाचा हा अंदाज अत्यंत क्लेषकारक असतो. त्याचा त्रास होतो. इतरांनाही हा त्रास होऊ नये. अशा प्रकारच्या एक्झिट पोलमुळे जनमतावर परिणाम होतो. तिथल्या मतदारांची मानसिकता बदले. त्यांना वेदना होतात, असं सांगतानाच या एजन्सी कुणाच्या आहेत? कुणासाठी त्या काम करतात? त्यांचा हेतू काय? असा सवालही त्यांनी केला.

Post Top Ad

test