Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

केईएम रुग्णालयात निवासी डॉक्टरची आत्महत्या



मुंबई - मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवी हिने जातीवादाला कंटाळून आत्महत्या केली आहे. हे प्रकरण ताजे असतानाच परळ केईएम रुग्णालयात एका डॉक्टरने आत्म्हत्या केली आहे. डॉ. प्रणय जयस्वाल असं या डॉक्टरचं नाव आहे. डॉ. प्रणय सीनियर मे़डिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. या आत्महत्येच्या प्रकरणाची भोईवाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस यासंदर्भात पुढील तपास करत आहेत. केईएम रुग्णालयात दोन महिन्याचा प्रिन्स भाजल्याने त्याचा हात कापण्यात आला आहे. याची चौकशी सुरु असतानाच आता एका डॉक्टरने आत्महत्या केल्याने केईएम रुग्णालयाची डोकेदुखी वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीचे असणारे डॉ. प्रणव यांनी जनरल सर्जरीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर डॉ. प्रणव केईएम रूग्णालयात सिनीयर मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होते. शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून त्यांचा फोन बंद येत होता. फोन बंद येत असल्याने मित्रांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. अखेर शनिवारी सकाळी वसतिगृहाच्या गच्चीवर त्यांचा मृतदेह सापडला. या डॉक्टरच्या मृतदेहाच्या जवळ आय.व्ही इन्जेक्शन पोलिसांना सापडलं आहे. ‘‘डॉ. जयस्वाल यांचा शुक्रवारी संध्याकाळपासून काहीच पत्ता नव्हता. शनिवारी सकाळी त्यांच्या मित्राने येऊन तो रात्री खोलीत आला नव्हता. त्यानंतर फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन बंद होता. या डॉक्टरचा पत्ता लागत नसल्याने पोलिसांच्या मदतीने शोधकार्य सुरू केलं. तेव्हा सकाळी 10.30 च्या सुमारास वसतीगृहाच्या गच्चीवर त्यांचा मृतदेह सापडला. आत्महत्येचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. याप्रकरणी डॉक्टराच्या कुटुंबियांना कळवण्यात आले आहे.’’ त्याचे कुटुंबीय मुंबईत आज सायंकाळपर्यंत पोहचणार आहेत. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom