Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट


मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा गुंता न सुटल्यान अखेर आजपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्तास्थापनेची संधी उपलब्ध करुन देण्यात येईल. आणि त्यानंतर राष्ट्रपती राजवट उठवण्यात येईल, असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले. महत्त्वाचे राज्यात तीनवेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

यापूर्वी राज्यात दोन वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असून आता तिसऱ्यांदा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यापूर्वी १९८० आणि २०१४ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. १९७८ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोदचं सरकार होतं. हे सरकार बरखास्त करुन त्यावेळी विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका पार पडल्या. त्यामुळे १७ फेब्रुवारी ते ९ जून १९८० या काळात महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्येही महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीखाली गेलं. ही राष्ट्रपती राजवट ३२ दिवसांसाठी होती. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळलं होतं व त्यानंतर २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ यादरम्यान महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता सत्तास्थापनेचा गुंता न सुटल्याने आजपासून राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom