Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांसाठी ९ जानेवारीला मतदान


मुंबई, दि. 9 : बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान; तर 10 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

मदान यांनी सांगितले की, नामनिर्देशनपत्रे 16 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 22 डिसेंबर 2019 रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 24 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 26 डिसेंबर 2019 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 27 जानेवारी 2019 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: नाशिक- 22अ आणि 26अ, मालेगाव- 12 ड, नागपूर- 12ड, लातूर- 11अ, पनवेल- 19ब आणि बृहन्मुंबई- 141.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom