Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गृहनिर्माण सोसायट्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे


मुंबई -- मुंबईत सातत्याने घडणा-या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेकडून जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. आगीची घटना घडल्यावर काय करायला हवे याबाबत पालिकेकडून गृहनिर्माण सोसायट्या, आस्थापनांना प्रशिक्षण देणार आहे. हे प्रशिक्षण वॉर्डनिहाय प्रत्येक सोसायट्यांमधून दिले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिका-याने दिली.

वर्षभरापूर्वी अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्व पालिका रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे देण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार पालिका रुग्णालयात एनडीआरएफकडून डॉक्टर आणि परिचारिकांना आपत्कालीन व्यवस्थापनांचे प्रशिक्षण दिले गेले. आता गृहनिर्माण सोसायटया, आस्थापनांना प्रशिक्षण दिले देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. अग्निसुरक्षेचे महत्वही सांगितले जाणार आहे. याबाबत जनजागृतीही केली जाणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांना एकत्रित करून व काही सोसायट्यांच्या घरोघरी जाऊन रहिवाशांना प्रशिक्षण दिले दिले जाईल. आपात्कालीन परिस्थिती उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर कसा करावा, प्रथमोपचार, काय करावे आणि काय करू नये या बाबींची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली जाणार आहे. यावेळी विविध माध्यमातून जनजागृतीही केली जाईल असेही अधिका-याने सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom