Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

प्रज्ञासूर्याला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर


मुंबई - डोक्यावर निऴी टोपी, हातात झेंडा, काखेला सामानाची बॅग अडकवून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने लाखोंच्या संख्येने निळ्य़ा लाटा चैत्यभूमीच्या दिशेने धडकल्या आहेत. प्रज्ञासूर्याला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. देशाच्या कानाकोप-यातून तीन दिवस आधीपासूनच लाखोंच्या संख्येने आलेल्या कष्टक-यांसह खेड्यापाड्यातून आलेल्या छोट्या तान्हुल्यापासून ते वयोवृध्दांपर्यंत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्य़भूमीवर रांगा लागल्या आहेत.

जबतक सूरज चाँद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अशा घोषणांनी चैत्यभूमी परिसर दणाणून जात आहे. चैत्यभूमीच्या दिशेने येणारे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी- शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे लाखो भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करताना दिसत आहेत. तीन दिवस आधीपासूनच जनसागर लोटला आहे. देशाच्या कानाकोप-यातून आलेले भीमसैनिक शिवाजी पार्क परिसरात मिळेल त्या जागेत थंडी - वा-य़ात कुटुंबांसह मुक्कामास आहेत. मात्र चेह-यांवर थकव्याचा लवलेशही दिसत नाही. अनेक सामाजिक संस्था, संघटनांकडून मोफत भोजनदान करण्यासाठी त्यांनी जय्यत तयारी केली आहे. चैत्यभूमी परिसरात प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिर, क्रांती गीतांच्या कॅसेटस आणि ध्वनीफिती, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्यांचे स्टॉल्स, महामानवाच्या प्रतीमा व पुतळे खरेदी करण्यासाठी स्टॅालवर गर्दी उसळली आहे. लाखोंच्या संख्येने महामानवाला अभिवादन करण्यासाठी छोट्या लेकरांसह ८० वर्षाच्या वृध्दांपर्यंत सा-यांनीच अभिवादनासाठी रांगा लावल्या आहेत. शिवाजी पार्क व चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्य़ा होणा-य़ा सभांचे बॅनर्स पाहून अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्य़ात आली. मुंबई महापालिकेकडून उत्तमरित्या सोयी -सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. 
 
महाराष्ट्राच्या खेड़्या-पाड्यातून तसेच आंध्रा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी भागातून छोट्या तान्हुल्यापासून ते वयोवृध्दांचीही पावले दरवर्षी प्रमाणे चैत्य़भूमीच्या वाटेवर वळली आहेत. काही २० ते २५ वर्षापासून नित्यनेमाने येणारे अनुयायीही आहेत. दादर रेल्वेस्टेशन ते शिवाजीपार्क- चैत्यभूमीपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या सुविधाही पुरेसा पुरवण्यात आल्य़ाने अनेकांनी समाधान व्यक्त केले. चैत्य़भूमी व शिवाजीपार्क परिसरात डॅा. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौत्तम बुध्द, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूमहाराज, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील साहित्यांनी स्टॉल सजले आहेत. आंबेडकर, गौत्तम बुध्द यांच्या प्रतीकृती, छायाचित्रांचे स्टॅाल्सही लावण्यात आले आहेत. मागील दोन - तीन दिवसांपासून येथे मुक्कामास असलेल्यांना विविध सामाजिक संस्था, संघटना, बँका, लोकप्रतिनिधींनी अल्पोहार व जेवणाची व्यवस्था केली आली आहे. अभिवादनासाठी जवळपास पाच ते सहा तास रांगेने उभ्या असणा-या अनुयायांना पिण्याच्य़ा पाण्याची उत्तम सोय करण्यात आली आहे. वाहतुकीसोबतच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याठिकाणी पोलिस कर्मचारी आणि समता सैनिक दल तैनात करण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनानेही दादर रेल्वे स्टेशन ते चैत्यभूमीपर्यंतचा परिसर फेरीवालामुक्त केला आहे. त्यामुळे रस्त्यांनीही मोकळा श्वास घेतला होता. 

बाबासाहेबांच्या विचारांच्या क्रांतीच्या गीतांनी अवघा चैत्यभूमी ते शिवाजीपार्कचा परिसर दणाणून गेला आहे. दादर रेल्वेस्थानक ते चैत्यभूमी, शिवाजीपार्कपर्यंत अभिवादनाचे फलक लागले आहेत. ग्रामीण भागातून आलेले कष्टकरी ७ डिसेंबरपर्यंत राहण्याच्या तयारीने आले आहेत. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी नेत्यांच्या होणा-या सभा ऐकण्यासाठीही अनेकजण उत्सुक आहेत. मात्र नेत्यांच्या वेगवेगळ्या चुली अजूनही कायम असल्याने अनेकांनी नाराजीही व्यक्त केली.

बेस्टकडून चोख व्यवस्था --बेस्ट उपक्रमाच्यावतीने महा मानवाला अभिवादन करण्यासाठी येणा-य़ा अनुयायींकरीता अल्पोपहार, चहा, पाणी तसेच प्रथमोपचार, नेत्रतपासणी आदी वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली आहे. चैत्यभूमीकडे जाण्यासाठी जादा बसेसची सोय करण्यात आली आहे. बेस्ट प्रवर्तन नियंत्रण व मार्गदर्शनासाठी वाहतूक अधिकारी कर्मचा-यांची नेमणूक केली आहे. अखंडीत वीज पुरवठ्यासाठी जनरेटरर्स एरियल लिफ्टस व विशेष पथक नेमले आहेत. दिवे व सर्च लाईट लावण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिीसाठी बस गाड्या तैनात केल्या आहेत. दादर स्थानक ते चैत्यभूमीपर्यंत बसेसच्या विशेष फे-या चालवण्यात येत आहेत. मुंबई दर्शनासाठी चैत्यभूमीपासून १५० रुपयांत विशेष बसेस सोडण्यात आल्या आहेत.

पालिकेतर्फे विविध नागरी सेवा - सुविधा उपलब्ध
माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे मोफत वितरण 
डॉ. आंबेडकरांना अभिवादनासाठी मुंबईत येणा-या अनुयायांकरि‍ता महापालिकेकडून चैत्‍यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्‍थान ‘राजगृह’ यासह आवश्यक ठिकाणी सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विविध नागरी सेवा - सुविधा उपलब्ध केल्या जातात. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिकेचे प्रकाशन गुरुवार, ५ डिसेंबर रोजी शिवाजी पार्क येथे मुंबईच्‍या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक (कुर्ला) टर्मिनस येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तात्‍पुरत्‍या निवा-याची सोय म्‍हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्‍या ७ शाळा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत. या शाळांमध्ये आवश्‍यक त्‍या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्‍यात आल्‍या आहेत. सुमारे १० हजार अनुयायांची त्यात व्‍यवस्‍था होऊ शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom