Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मराठा आरक्षण, भीमा कोरेगाव प्रकरणातील गुन्हे रद्द करा - नसीम खान


मुंबई, दि. ४ नोव्हेंबर २०१९ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर करण्यात आलेल्या आंदोलनावेळी दाखल करण्यात आलेले गुन्हे तसेच भीमा-कोरेगाव प्रकरणातही अनेक निरपराध लोकांवर दाखल केलेले गुन्हेही सरकारने रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेस नेते माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दोन्ही प्रकरणातील गुन्हे रद्द करण्याची मागणी केलेली आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राज्यभरातले लाखो होतकरू व बेरोजगार तरुण तरुणींनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलकांवर दगडफेक, जाळपोळ, खुनाचे प्रयत्न यासारखे खोटे गुन्हे भाजपा सरकारने सुडाच्या भावनेतून दाखल कलेले आहेत. या तरुणांच्या भवितव्याचा विचार करुन हे गुन्हे रद्द करावेत असे या पत्रात म्हटले आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणातही तत्कालीन फडणवीस सरकारने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवरील दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत अशी मागणीही नसीम खान यांनी केली आहे. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आले असून या दोन्ही प्रकरणातील गुन्हे रद्द करुन दोन्ही समाजाला दिलासा द्यावा, असेही नसीम खान यांनी मागणी केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom