Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याची जागा बदलली


मुंबई -- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील रिगल सिनेमागृह आणि राज्य पोलिस महासंचालक इमारतीसमोरील चौकामध्ये बसवण्यास पालिका, हेरिटेज, राज्य सरकारच्या सर्व प्रकारच्या परवानग्या मिळालेल्या असतानाच आता या पुतळ्याची जागाच बदलण्यात आली आहे. आता हा पुतळा महात्मा गांधी मार्गावरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर बसवण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत जागा बदलण्याचा मंजूर करण्यात आला. मात्र आता पुन्हा परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी बाळासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा दक्षिण मुंबईतील रिगल सिनेमासमोरील वाहतूक बेटात बसवण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार गटनेत्यांच्या बैठकीत व त्यानंतर पालिका सभागृहाची मंजुरी घेण्यात आली. पुतळा बसवण्यासाठी पालिकेच्या कुलाबा येथील ‘ए’ विभागाच्यावतीने वाहतूक पोलिसांसह हेरिटेज व अन्य सर्व प्रकारच्या परवानगी घेण्यात आल्या. त्यानंतर पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पुतळा उभारला जाणार असतानाच अपू-या जागेचे कारण देत जागा बदलण्याचा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी गुरुवारी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस (एनजीएमए) या इमारतीसमोर महात्मा गांधी रोड, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये बसवावा अशी मागणी महापौरांना पत्र पाठवून त्यांनी केली. त्यानुसार या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom