काँग्रेसच्या नाराजीनंतर संजय राऊत नरमले - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

16 January 2020

काँग्रेसच्या नाराजीनंतर संजय राऊत नरमले


मुंबई: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी कुख्यात गुंड करीम लाला यांना भेटायला मुंबईत येत होत्या. असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आलाय आहे. त्यानंतर संजय राऊत नरमले आहेत. 'इंदिरा गांधी यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मी नेमकं काय बोललो आणि कशासंदर्भात बोललो हे समजून घ्या. विनाकारण राजकारण करू नका,' असं स्पष्टीकरण राऊत यांनी दिलं आहे. 

'मुंबईतील अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या,' असं वक्तव्य राऊत यांनी एका कार्यक्रमात केलं होतं. त्यावरून काँग्रेसमध्ये नाराजी आहे. राऊत यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा केला. 'इंदिरा गांधी व करीम लाला यांच्या भेटीबद्दलच्या माझ्या वक्तव्यात आक्षेपार्ह काहीही नाही. करीम लाला हा पठाणांचा नेता होता. पख्तुन-ए-हिंद संघटनेचा अध्यक्ष होता. सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान यांच्याशी तो जोडलेला होता. तो आपल्या व्यक्तिगत कामांसाठी अनेकांना भेटायचा,' असं संजय राऊत म्हणाले.

'इंदिरा गांधी यांच्याबद्दल आम्हाला कायमच आदर आहे. नेहरू, इंदिरा, राजीव गांधी यांच्यावर जेव्हा-केव्हा टीका झाली, त्यावेळी आम्ही त्यांचं समर्थन करण्याची भूमिका घेतली. काँग्रेसवाले गप्प असतानाही आम्ही गांधी घराण्याचं समर्थन करायचो,' असंही राऊत म्हणाले.

Post Top Ad

test