Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतीगृहास चांगल्या सुविधा देणार


मुंबई, दि. 21 : वरळी बीडीडी चाळ येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतीगृहाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी वसतीगृहाला भेट दिली असून त्या सोडविण्यासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री धनंजय मुडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

वरळी बीडीडी चाळ येथील वसतीगृहाच्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहाला मिळाणाऱ्या सुविधांबाबत आंदोलन केले होते. त्याची तत्काळ दखल घेवून मुंडे यांनी आज वसतीगृहास भेट देवून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मुंडे यावेळी म्हणाले, शासकीय मागासवर्गीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णयामध्येही बदल करण्याबाबत विभागामार्फत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. राज्यातील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांना निवासाची, भोजनाची व इतर शैक्षणिक सुविधांबाबत लवकरच आढावा घेवून निर्णय घेण्यात येईल.

वरळी वसतीगृह येथे 15 दिवसांत सोयीसुविधा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. मुंबईमध्ये मुलामुलींच्या वसतीगृहासाठी नव्याने बांधकाम सुरु असून ते काम पुर्ण होईपर्यंत येथील वसतीगृहाला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, असेही मुंडे यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार कपिल पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom