Type Here to Get Search Results !

बेस्टच्या हलगर्जीमुळे महिला प्रवाशाचा मृत्यू


मुंबई - विनावाहक बस चालवण्याचा निर्णय घेत बसेसचे मागील दार बंद ठेवत बस चालण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला. मात्र बेस्ट प्रशासनाचा हा निर्णय प्रवाशांच्या जीवावर बेतू लागला आहे. बस मार्ग क्रमांक ३३८ ही बस बँकबेहुन चर्चगेट स्थानकाजवळ घेऊन जात होते. ही बस विनावाहक होती. या विनावाहक बसमध्ये असलेल्या महिला प्रवासीला भोवळ आली आणि बसमध्येच पडली. सहप्रवाशांनी याबाबत ओरड केली असता बसचालक बस थांबवून आला. परंतु काय करावे हे त्याला कळेना. अखेर त्या महिला प्रवासीचा बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना घडली असून बेस्ट प्रशासनाच्या हलगर्जीमुळेच प्रवासी दगावल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

प्रशासनाच्या आडमुठेपणा धोरणामुळे आज एका महिला प्रवाशीस आपला प्राण गमवावा लागला. मंगळवारी बस चालक ०३११६ हे बस क्र ३३८ मार्ग क्र ८०९१/४ हि बस विना वाहक बॅकबे आगारातून चर्चगेटच्या दिशेने बाहेर काढली. ज्या थांब्यावर तिकिट द्यायची सोय उपलब्ध आहे त्या थांब्यावरील प्रवासी घेवून चालक साहेबराव वामण इलग बस पूढे निघाला. बस मेकर टॉवर आली आतून ओरडण्याचा आवाज आला असता चालकाने गाडी थांबवून काय झाले ते विचारले असता एक महिला प्रवाशी निपचित पडलेल्या अवस्थेत आढळून आली चालकाला काय करावे हे कळत नव्हते एरव्ही त्याच्या मदतीला वाहक असायचा पण प्रशासनाच्या आडमुठेपणा धोरणामुळे तोही थोडावेळ गांगरला व लगेच हुशारीने पोलिसांना (१००) नंबरवर फोन करून बोलावून घेतले. मात्र तोपर्यंत महिलेचा बसमध्येच मृत्यू झाला. दरम्यान, बेस्ट प्रशासनाच्या हलगर्जीमुळेच प्रवाशांच्या जीवावर बेतू लागल्याचा आरोप समर्थ बेस्ट कामगार संघटनेचे खजिनदार विठ्ठल गवस यांनी केला आहे.
Tags

Top Post Ad

Below Post Ad