Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी घेतला आढावा


मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या यंत्रणेनी केलेली तयारी, उपाययोजना आदींचा आढावा गुरुवारी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला. याबाबत गुरुवारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात आलेली तयारी, उपाययोजना आदींचे सादरीकरण करण्यात आले.

जगभरात झपाट्याने पसरलेल्या कोरोनाने शेकडोंचे बळी घेतले आहे. देशातही कोरोनाचे २९ रुग्ण सापडल्याने देशातील सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरानाशी मुकाबला करण्यासाठी मुंबई महापालिकेची यंत्रणाही सज्ज झाली आहे. रुग्णांना तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईतील रुग्णालयात विशेष कक्ष सुरु केली आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार विविध उपाययोजना केल्या आहेत. सद्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणा-या पर्यटकांची तपासणी करून संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतले जाते आहे. निदानासाठी अद्ययावत प्रयोगशाळाही निर्माण करण्यात आली असून डॉक्टरांची टीम तैनात केली आहे. पालिकेच्या रुग्णालयासह राज्य सरकारच्या व खासगी रुग्णालयांनाही अशा रुग्णांना तपासणीसाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र, राज्य व पालिका यांच्या समन्वयाने कोरोनाचा प्रतिबंध केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तयारी, उपाययोजना आदींबाबत पालिकेने सादरीकरण केले. मुंबई महापालिकेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकीला केंद्र सरकारकडून डॉ. खापर्डे, डॅा. सुळे, डॉ. गिरीश, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. संदीप भारसवाडकर, संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन डॉ. तात्याराव लहाने, भारतीय वैद्यक संघटनेचे डॉ. अविनाश भोंडवे, तसेच ठाणे, नवीमुंबई, मीरा-भाईंदर, वसई- विरार, भिंवंडी, कल्याण, उल्हासनगर या स्थानिक स्वराज्य संस्थांचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वैद्यकीय अधिकारी तसेच मध्य, पश्चिम रेल्वे, मुंबई पोर्ट, जेएनपीटी यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom