मुंबईत आणखी ९ रुग्ण कोरोना पाॅझीटीव्ह, रूग्णांची संख्या ८६


मुंबई -  कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून गेल्या २४ तासांत मुंबईत कोरोनाचे ९ पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले असून पाॅझिटीव्ह रुग्णांमध्ये ३ महिला व ६ पुरुषांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईतील कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची संख्या आता ८६ वर पोहोचली आहे. दरम्यान, संशयित कोरोनाच्या २०९ रुग्णांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या उप कार्यकारी अधिकारी डाॅ. दक्षा शहा यांनी सांगितले. तर मृतांची संख्या पाच झाली असून ६५ वषीॅय महिलेचा गुरुवारी रात्री उशीरा मृत्यू झाला. 

गेल्या २४ तासांत मुंबईत ९ रुग्ण कोरोना पाॅझिटीव्ह आढळले असून ९ पैकी ३ रुग्ण मुंबईबाहेरील म्हणजे वसई, ठाणे व गुजरात येथील आहेत. तर ६ रुग्ण मुंबई उपनगरातील आहेत. गेल्या २४ तासांत आढळलेल्या रुग्णांमध्ये चार रुग्ण हे कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णांच्या संपकाॅत आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर अन्य पाच रुग्ण हे परदेशातून आले आहेत. गेल्या २४ तासांत आढळलेल्या रुग्णांपैकी ६ रुग्णांवर कस्तुरबा तर रुग्णांवर कुर्ला भाभा रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे शहा यांनी सांगितले.

आज दिवसभरात तपासणी केलेले रुग्ण - 33९
संशयीत भरती केलेले रुग्ण - २०९
एकूण पाॅझिटीव्ह - ८६
आतापर्यंत मृत - ५