चीनला धडा शिकवण्यासाठी सरकारने केला या नियमात बदल - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 April 2020

चीनला धडा शिकवण्यासाठी सरकारने केला या नियमात बदल


मुंबई - कोरोना विषाणूचे संकट जगभरात पसरले आहे. त्याचा फायदा घेऊन चीनकडून अनेक देशांमधील उद्योग आणि कंपन्या ताब्यात घेण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यासाठी भारता बाजूच्या राष्ट्रांमधील कंपन्यांना कोणत्याही उद्योग आणि कंपन्यामध्ये FDI म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक करताना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा नियम करण्यात आला आहे. चीनला लगाम लावता यावा म्हणून हा नियम बनवण्यात आला आहे.

चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश म्यानमार आणि पाकिस्तान या देशांच्या सीमा भारताला लागून आहेत. या निर्णय़ामुळे चीनच्या भारतातील गुंतवणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो. कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था अडचणीत असताना आणि अडचणीतील उद्योगांच्या परिस्थितीता गैरफायदा काही देशांकडून घेतला जाण्याची शक्यता असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशच्या बाबतीत हे निर्बंध आधीपासूनच लागू आहेत. त्यामुळे भारताने या निर्णय़ातून चीनला धक्का दिल्याचे मानले जात आहे. भारतातील अडचणीतील कंपन्या किंवा उद्योग आपल्या ताब्यात घेण्याची संधी चीन सोडणार नाही हे ओळखून सरकारने हे पाऊल उचलले आहे.  या नियमामुळे भारताला सीमा लागून असलेल्या देशातील कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती भारतातील कोणत्याही क्षेत्रात सरकारच्या मंजुरीविना गुंतवणूक करू शकणार नाही.

Post Bottom Ad