Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

राज्यात कोरोनाचे २१० नवीन रुग्ण, एकूण रुग्णसंख्या १५७४


राज्यातील १८८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी - आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.१०: राज्यात आज कोरोनाच्या २१० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १५७४ झाली आहे. कोरोनाबाधित १८८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ११७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ हजार ९३ नमुन्यांपैकी ३० हजार ४७७जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १५७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आतापर्यंत १८८ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३८ हजार ९२७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४७३८ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

आज राज्यात १३ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईचे १० तर पुणे, पनवेल आणि वसई विरार येथील प्रत्येकी १ आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी ९ पुरुष तर ४ महिला आहेत. आज झालेल्या १३ मृत्यूपैकी ६ जण हे ६० वर्षांवरील आहेत ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत तर दोघेजण ४० वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ११ रुग्णांमध्ये (८५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

*राज्यातील जिल्हा आ्रणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील

मुंबई महानगरपालिका १००८ (मृत्यू ६४)

ठाणे ०३

ठाणे मनपा २८ (मृत्यू ०३)

नवी मुंबई मनपा ३२ (मृत्यू ०२)

कल्याण डोंबवली मनपा ३४ (मृत्यू ०२)

उल्हासनगर मनपा ०१

भिवंडी निजामपूर मनपा ००

मीरा भाईंदर मनपा २१ (मृत्यू ०१)

पालघर ०३ (मृत्यू ०१)

वसई विरार मनपा १२ (मृत्यू ०३)

रायगड ००

पनवेल मनपा ०६ (मृत्यू ०१)

- ठाणे मंडळ एकूण ११४७ (मृत्यू ७७)

नाशिक ०१

नाशिक मनपा ०१

मालेगाव मनपा ०५ (मृत्यू ०१)

अहमदनगर ०९

अहमदनगर मनपा १६

धुळे ००

धुळे मनपा ००

जळगाव ०१

जळगाव मनपा ०१ (मृत्यू ०१)

नंदूरबार ००

- नाशिक मंडळ एकूण ३४ (मृत्यू ०२)

पुणे ०७

पुणे मनपा २१९ (मृत्यू २५)

पिंपरी चिंचवड मनपा २२

सोलापूर ००

सोलापूर मनपा ००

सातारा ०६ (मृत्यू ०१)

- पुणे मंडळ एकूण २५४ (मृत्यू २६)

कोल्हापूर ००

कोल्हापूर मनपा ०५

सांगली २६

सांगली मिरज कुपवाड मनपा ००

सिंधुदुर्ग ०१

रत्नागिरी ०५ (मृत्यू ०१)

- कोल्हापूर मंडळ एकूण ३७ (मृत्यू ०१)

औरंगाबाद ०१

औरंगाबाद मनपा १६ (मृत्यू ०१)

जालना ०१

हिंगोली ०१

परभणी ००

परभणी मनपा ००

- ओरंगाबाद मंडळ एकूण १९ (मृत्यू ०१)

लातूर ००

लातूर मनपा ०८

उस्मानाबाद ०४

बीड ०१

नांदेड ००

नांदेड मनपा ००

- लातूर मंडळ एकूण १३

अकोला ००

अकोला मनपा १२

अमरावती ००

अमरावती मनपा ०४ (मृत्यू ०१)

यवतमाळ ०४

बुलढाणा १३ (मृत्यू ०१)

वाशिम ०१

- अकोला मंडळ एकूण ३४ (मृत्यू ०२)

नागपूर ००

नागपूर मनपा २५ (मृत्यू ०१)

वर्धा ००

भंडारा ००

गोंदिया ०१

चंद्रपूर ००

चंद्रपूर मनपा ००

गडचिरोली ००

- नागपूर मंडळ एकूण  २६ (मृत्यू ०१)

इतर राज्ये ०९

एकूण १५७४ (मृत्यू ११०)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण ४३७४ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी साडेसोळा लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom