Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ग्रीन, ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी



नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा (Lockdown – 3) कालावधी पुन्हा एकदा (Beauty Parlor And Saloon) वाढवण्यात आला आहे. येत्या 3 मे रोजी संपणारा लॉकडाऊन आता 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र, यादरम्यान काही गोष्टींवर सूटही देण्यात आली आहे. 4 मेपासून सुरु होणाऱ्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या भागात ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून उघडण्यास सशर्त परवानगी असेल, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केलं. त्याशिवाय, इ-कॉमर्स कंपन्या या क्षेत्रात अत्यावश्यक सामांनांव्यतिरिक्त (Beauty Parlor And Saloon) इतर सर्व वस्तूंची विक्री करु शकतील.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सलून उघडण्याची परवानगू असेल. येत्या 4 मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील सलून चालक त्यांची दुकानं उघडू शकतील, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या एका प्रवक्त्याने दिली. मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य असेल.

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने नवी नियमावली जारी केली आहे. ही नियमवामली फक्त काही मर्यादित क्षेत्रात लागू असेल. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात (Beauty Parlor And Saloon) आले आहेत.

– दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं.
– दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.
या नियमांनुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील दुकानं उघडं ठेवता येणार आहेत.

महाराष्ट्रातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन कुठले?
रेड झोन
मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, नागपूर, औरंगाबाद, सांगली

ऑरेंज झोन
कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा

ग्रीन झोन
नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, वर्धा, परभणी

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom