Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात शनिवारी कोकण दौऱ्यावर


मुंबई - निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे शनिवार दिनांक १३ जून रोजी एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत.

सकाळी ८.३० वाजता महसूलमंत्री हे शासकीय निवासस्थान रॉयलस्टोन येथून मोटारीने निघून ९.०० वाजता भाऊचा धक्का येथे पोहचतील त्यानंतर रोरो बोटीने मांडवा जेट्टी येथे जातील तेथून मोटारीने अलिबाग तालुक्यातील नागांव व चौल गावाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर काशीद व नंतर मुरुड येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील.

दुपारी १.१० वाजता महसूलमंत्री अधिकऱ्यांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर आगरदांडा येथे आगमन व रोरो बोटीने दिघी बंदराकडे प्रयाण करतील त्यानंतर दिवे आगार, तुरुंवडी या भागातील नुकसानीची पाहणी महसूलमंत्री करतील व ४.३० वाजता मोटारीने मुंबईकडे प्रयाण करतील.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom