मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७५ हजारावर, ४३६९ मृत्यू

JPN NEWS

मुंबई - मुंबईत २४ तासांत १३०० नवीन रुग्णांची नोंद झाली असून २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या ७५०४७ झाली असून एकूण मृतांचा आकडा ४३६९ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्ण वाढ दिसत असली तरी रविवारी दिवसभरात ८२३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ४३१५४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या अॅक्टीव २७५२४ रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

धारावीत रविवारी १३ नवीन रुग्ण आढळले. येथे रुग्णांची एकूण संख्या २२४५ झाली आहे. तर दादरमध्ये २९ नवीन रुग्ण सापडले असून येथे रुग्णांची संख्या ८२० वर पोहचली आहे. माहिम येथे ३२ नवीन रुग्ण आढळले असून येथील रुग्णांची एकूण संख्या १०६८ वर पोहचली आहे.