Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

करोना - राज्यात २४ तासांत दगावले १२० रुग्ण


मुंबई - राज्यात आज करोनामुळे १२० जणांचा मृत्यू तर ३३९० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आज १६३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आतापर्यंत एकूण ५०,९७८ जणांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

राज्यात करोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ५० हजारावर गेली आहे. आज दिवसभरात राज्यातील विविध रुग्णालयांतून करोनामुक्त झालेल्या १६३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ५० हजार ९७८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३ हजार १७ इतकी आहे. या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण मोठे आहे.

राज्यात आज ३ हजार ३९० नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ७ हजार ९५८ इतकी झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण मुंबई , ठाणे आणि पुणे या भागातील आहेत. राज्यात सध्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४७.२ टक्के इतके असून मृत्यूदर ३.६५ इतका आहे. राज्यात सध्या ५, ८७,५९६ लोक होमक्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात १५३५ संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७७,१८९ खाटा उपलब्ध असून सध्या २९,६४१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

मुंबईत १३९५ नवे रुग्ण, ७९ मृत्यू -
राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. आज मुंबईत दिवसभरात १३९५ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ७९ रुग्णांना करोनामुळे प्राण गमवावे लागले. मुंबईत आता करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५८१३५ इतकी झाली असून त्यातील २६९८६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, २८९५९ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर २१९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom