लॉकडाऊन - काम नसताना रस्त्यावर फिराल तर वाहन जप्त होणार - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2020

लॉकडाऊन - काम नसताना रस्त्यावर फिराल तर वाहन जप्त होणार


मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचे हजारो रुग्ण आढळून येत असले तरी नागरिकांमध्ये अद्यापही कोरोनाची भीती नसल्याचे निदर्शनास आले आहे. राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांना वाहतुकीची परवानगी दिली आहे. त्यानंतरही अनेक जण दुचाकी आणि चारचाकी घेऊन रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा वाहन चालकांवर आज मुंबई पोलिसांनी वाहन जप्त करून कारवाई केली आहे.  

काही काम नसताना तुम्ही जर बाईक किंवा मोटारसायकल चालवत फिराल तर मुंबई पोलीस तुमच्याकडून दंड वसूल करणार आहेत. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा किंवा कार्यलयीन कामा व्यतिरिक्त जर कोणी असेच फिरताना आढळले तर त्याच्या वर कारवाई होणार असल्याचे संकेत मुंबई पोलीसांनी दिले आहेत. लाॅकडाऊन मध्ये सूट मिळल्याने अनेक मुंबईकर रस्तावर कामाव्यतरिक्त फिरताना पाह्यला मिळाले पण आता या फिरण्यावर पोलीसांकडून चांगलाच वचप बसणार आहे असे मुंबई पोलीस डी.सी.पी प्रणय अशोक यांनी सांगितले आहे. 

मुंबईकरांना आवाहन !
राज्य सरकारतर्फे 'Mission Begin Again' अंतर्गत अनेक परवानग्या दिल्या आहेत. कोविड -19 चा धोका अजूनही कायम असल्याने सर्वांनी सुरक्षेसाठी फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे. तथापि, अनेकजण या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे स्वतःच्या व इतरांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे व नियम पाळावेत असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

काय आहे नियम -
1. घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात.
2. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.
3. घरापासून फक्त 2 कि.मी.च्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 कि.मी. च्या बाहेर जाऊ नये.
4. व्यायामाची परवानगी घरापासून 2 किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.
5. कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 2 कि.मी. च्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.
6. Social Distancing च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
7. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
8. Social Distancing चे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.
9. रात्री 09. 00 ते पहाटे 05.00 वा. दरम्यानच्या कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.
10. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळुन येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.

Post Bottom Ad