Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू



मुंबई - अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अखेर तीन महिन्यानंतर मुंबईची उपनगरीय लाेकल सेवा सोमावरपासून सुरू होणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर २०० तर पश्चिम रेल्वे मार्गावर १२० अशा एकूण ३२० लोकल फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. राज्य सरकार, महापालिका आणि रेल्वे मिळून हा निर्णत घेतला असून याला रेल्वे बोर्डानेही मान्यता दिली आहे.

लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्ट, एसटीच्या बसद्वारे सेवा पुरवली जात आहे. मात्र या बसमधील प्रवासातील वेळ, फिजिकल डिस्टनसिंगचे तीनतेरा, बसमध्ये जाण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या लांबच्या लांब रांगेमुळे कर्मचाऱ्यांना प्रवास नकोसा आणि जीवघेणा वाटू लागला आहे. त्यामुळे फक्त आत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी लाेकल सुरु करण्यात यावी, आशी मागणी सतत राज्य सरकारद्वारे केंद्राला आणि रेल्वे मंत्र्याकडे करण्यात आली आहे. त्यानुसार लाेकल सेवा सुरु करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. रविवारी राज्य सरकार आणि रेल्वे आधिकाऱ्यांमध्ये याबाबत आंतिम निर्णयझालेला आहेत. त्याला रेल्वे बोर्डानेसुद्धा मान्यता दिली आहेत.

मुख्य मार्गवर सीएसएमटी ते कसारा, कर्जत, कल्याण, ठाणे अशा लोकलच्या १३० फेऱ्या धावणार आहे. तर हार्बर मार्गवर सीएसएमटी ते पनवेल ७० लोकल फेऱ्या धावणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गवर चर्चगेट ते डहाणू रोड दरम्यान १२० लोकल फेऱ्या धावणार आहे. ज्यात ६० अप मार्गावर आणि ६० डाऊन मार्गावर अशा १२० लोकल फेऱ्या धावणार आहे. या विशेष लोकल फेऱ्याना काही महत्वपूर्ण ठिकाणी थांबणार आहे. सर्व लोकल या जलद असणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom