मुंबईत ७१७ नवीन रुग्ण - ५५ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

28 July 2020

मुंबईत ७१७ नवीन रुग्ण - ५५ रुग्णांचा मृत्यू


मुंबई - मुंबईत २४ तासांत ७१७ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या ११०८४६ झाली असून एकूण मृतांचा आकडा ६१८४ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी मंगळवारी दिवसभरात तब्बल २४६७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ८४४११ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या अॅक्टीव २०२५१ रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

धारावीत दिवसभरात तीन नवीन रुग्ण आढळले. येथील रुग्णांची संख्या २५४३ झाली आहे. यातील २२०४ रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे येथे अॅक्टीव ८८ रुग्ण आहेत. तर दादरमध्ये १७ नवीन रुग्ण सापडले. येथील एकूण रुग्णांची संख्या १६६४ झाली असली तरी ११४२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे येथे अॅक्टीव ४४९ रुग्ण आहेत. माहिममध्ये ११ नवीन रुग्ण आढळले असून येथीले रुग्णांची संख्या १६३२ वर पोहचली आहे. मात्र यातील १३६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे येथे सद्या २०० रुग्ण अॅक्टीव आहेत.

Post Top Ad

test