मुंबईत रुग्ण दुपट्टीचा कालावधी ७८ दिवसांवर - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

02 August 2020

मुंबईत रुग्ण दुपट्टीचा कालावधी ७८ दिवसांवर


मुंबई - योग्य उपचार पद्धती व प्रभावी उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोनावर नियंत्रण आणण्यात पालिका आरोग्य विभागाला यश येत आहे. मुंबईत कोरोना दुपटीचा कालावधी दिवसेंदिवस वाढतो आहे. रविवारी हा कालावधी ७५ दिवसांवर पोहचला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दरही घसरला असून आता ०.९० टक्केवर आला आहे. त्यामुळे मुंबईत आता कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र आहे.

कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर पालिकेसह राज्य सरकारची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. उपचार पद्धती, प्रभावी उपाययोजना कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा तात्काळ शोध घेऊन क्वारंटाईन, आरोग्य तपासणी, स्क्रिनिंग, नियमांची कठोर अंमलबजावणी, वाढवण्यात आलेल्या चाचण्या आदींमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवणे पालिकेला यश येते आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा कालावधी वाढत जात असून तीन दिवसांपूर्वी ७५ दिवसांवर असलेला कालावधी वाढून ७८ दिवसांवर गेला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दरही कमी होतो आहे. रविवारी हा दर ०.९० टक्केवर आला आहे. शिवाय २४ विभागांपैकी ४ विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०० वर आहे. तर दोन विभागात ९० च्यावर, सहा विभागात ८० च्यावर व पाच विभागात ७० च्यावर आहे. तर २४ विभागापैकी १८ विभागात रुग्ण वाढीचा सरासरी दरही १ टक्केपेक्षा कमी असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

Post Top Ad

test