मुंबईत ११०५ नवीन रुग्ण, ४९ रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 August 2020

मुंबईत ११०५ नवीन रुग्ण, ४९ रुग्णांचा मृत्यू


मुंबई - मुंबईत २४ तासांत ११०५ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या ११६४५१ झाली असून एकूण मृतांचा आकडा ६४४४ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी रविवारी दिवसभरात ३९३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ८८२९९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या अॅक्टीव २१४१२ रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

धारावीत रविवारी १३ नवीन आढळले असून येथील रुग्णांची संख्या २५७३ वर झाली आहे. यातील तब्बल २२४० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे येथील अॅक्टीव ८० रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दादरमध्ये २२ नवीन रुग्ण आढळले. येथील रुग्णांची संख्या १८२९ वर पोहचली आहे. मात्र यातील १२७३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे येथील सध्या अॅक्टीव रुग्ण ४८१ आहेत. तर माहिममध्ये दिवसभरात १४ रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची संख्या १७३२ झाली आहे. मात्र यातील १४३० रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या येथील अॅक्टीव रुग्ण २२८ असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Post Bottom Ad