Type Here to Get Search Results !

मुंबईत १०५९ नवीन रुग्ण - ४५ रुग्णांचा मृत्यू


मुंबई - मुंबईत २४ तासांत १०५९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या ११५३४६ झाली असून एकूण मृतांचा आकडा ६३९५ वर पोहचला आहे. दरम्यान रुग्णवाढ दिसत असली तरी शनिवारी दिवसभरात ८३२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ८७९०६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या अॅक्टीव २०७४९ रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

कोरोनामुळे चिंताग्रस्त परिस्थिती बनलेल्या धारावीत कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. शनिवारी ४ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या २५६० झाली आहे. यापैकी २२३५ जण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ७२ रुग्ण उपचार घेत आहेत. दादर येथे ३२ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्या १८०७ झाली आहे. यापैकी १२५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ४८२ रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. माहिम येथे २३ कोरोनाबाधित आढळले असून एकूण रुग्णसंख्या १७१८ झाली आहे. त्यांच्यापैकी १४२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २२४ जण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad