
मुंबई | सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी अखेर NCB (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ने रियाला अटक केली आहे. NCB ने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले असून या प्रकरणात ही सर्वात मोठी अटक आहे. तीन दिवस चाललेल्या2 चौकशीत रियाने अनेक मोठ्या कलाकारांची नावे घेतली आहेत.
रियाची खूप वेळ चौकशी करण्यात आली होती. बराच वेळ चौकशी झाल्यानंतर NCB ने रियाला अखेर अटक केली. रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आधीपासूनच NCB च्या ताब्यात होते.
रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती नियमितपणे ड्रग्स खरेदी करत होते असा आरोप त्यांच्यावर होता. सुशांतसुद्धा ड्रग्स घेत होता असा खुलासाही शौविकने चौकशीदरम्यान केला होता. रियाही असं सांगत होती की, मी आतापर्यंत कसल्याही अंमली पदार्थांचे सेवन केलेले नाही.
दरम्यान, सलग तीन दिवसांच्या चौकशीत रियाने अखेर कबूल केले की, ती ड्रग्स घेत होती. ड्रग्स बाबत सुरू असलेल्या तपासासाठी अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली.
चौकशीत स्वतः रियाने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे. एवढच नाही तर रियाने NCB ला ड्रग्स घेतल्या जाणाऱ्या बॉलीवूड पार्ट्यांबाबत माहिती दिली आहे. आता NCB या प्रकरणात सुशांतचे सहकारी असलेले २५ बॉलीवूड कलाकार आणि अभिनेत्यांना समन्स पाठवणार आहे. दरम्यान, रियाने कोणत्या कलाकारांची नावे घेतली हे अजून NCB ने स्पष्ट केलेले नाही.