Type Here to Get Search Results !

सुशांत सिंग प्रकरण - तपासासाठी नार्कोटिक्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांकडून भाजपच्या गाडीचा वापर


मुंबई - सिने अभिनेता सुशांत सिंग याच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित या प्रकरणाचा तपास सिबीआय, नार्कोटिक्स ब्युरो आणि इडीकडे देण्यात आला. मुंबई पोलिसांकडून हा तपास इतर यंत्रणांकडे देण्यामागे राजकारण असल्याची चर्चा होती. आज हि चर्चा खरी असल्याचे समोर आले आहे. नार्कोटिक्स ब्युरोचे तपास अधिकारी चक्क भाजपाचे चिन्ह असलेल्या गाडीचा वापर करत असल्याने उलटसुलट चर्चेला वेग आला आहे. 

सिने अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा १४ जून ला त्याच्या वांद्रे येथील राहत्या मृत्यू झाला होता. सुशांतची आत्महत्या नसून हि हत्या असल्याचा आरोप केला जात होता. या प्रकरणी सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे दिला. या प्रकरणाच्या दरम्यान ड्रग्स आणि पैशांचे व्यवहार झाल्याचे समोर आल्याने नार्कोटिक्स ब्युरो आणि इडी या यंत्रणांद्वारेही तपास करण्यात येत आहे. नार्कोटिक्स ब्युरोने या प्रकरणी सुशांतची मैत्रीण  रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कुक दीपेश सावंत यांना अटक केली आहे. तर, रियाचीही चौकशी केली जात आहे.

सुशांत सिंग प्रकरणाचा तपास सुरु असताना आरोपींना कोर्टात नेणे, रुग्णालयात चाचणी करण्यास नेणे, आरोपींना तपासासाठी नेणे आदी कामांसाठी नार्कोटिक्स विभागाकडून जी गाडी वापरली जात आहे त्या गाडीच्या नंबर प्लेटवर केंद्रात सत्तेत असलेल्या भाराताईंचे जनता पक्षाचे कमळ हे चिन्ह आहे. या गाडीचा नंबर MH 46 AP 6566 असून ती गाडी पनवेल येथून आरटीओ रजिस्ट्रेशन करण्यात आली आहे. नार्कोटिक्स ब्युरोचे अधिकारी कमळ चिन्ह असलेल्या गाडीतून तपास करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

दरम्यान याबाबत काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. नार्कोटिक्स ब्युरोच्या गाडीवर कमळाचे चिन्ह कशाला असे असा प्रश्न महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली असून १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad