Type Here to Get Search Results !

'१५ वर्षे काय मटार सोलत होतात?' - राबडी देवींचा मोदींना सवालनवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणूक प्रचाराने आता चांगलाच वेग घेतला असून विविध पक्ष एकमेकांवर चांगलीच टीका करू लागले आहेत. विकास, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीचे मुद्दे असतानाच करोनाच्या संकटामुळे सोशल मीडियावर देखील निवडणूक प्रचाराचे पडसाद अधिकच उमटू लागले आहेत. एनडीए आणि महाआघाडीचे नेते सतत एकमेकांवर हल्ले करताना दिसत आहेत. या दरम्यान लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर सतत टीकास्त्र सोडणारे बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यावेळी स्वत: ट्विटरवर फसल्याचे दिसले. या ट्विटरवर सुशील मोदी यांची चांगलीच खेचताना दिसत आहेत. 

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी काराकाटच्या एका निवडणूक प्रचार सभेत म्हटले की, जर आम्हाला संधी मिळाली तर बेरोजगारी दूर करण्यासाठी जराही वेळ घालवणार नाही. मोदी यांच्या या वक्तव्यावर वर्तमानपत्रांमध्ये बातम्या छापून आल्या. त्यांपैकी एक बातमी सुशील मोदी यांनी ट्विटरवर शेअर केली. मोदी यांचे ट्विट करत राबडी देवी यांनी लिहिले, 'लो कर लो बात. १५ वर्षांपासून काय मटार सोलत होतात काय?, बिहारमध्ये बेरोजगारी आहे हे नीतीश कुमार आणि सुशील मोदी यांना १५ वर्षांनंतर समजले आहे. तेजस्वी तुम्हा लोकांना आता मुद्द्यांवर आधारित राजकारण शिकवेल.' बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल सन २०१५ च्या निवडणुकीत ८१ जागा मिळाल्या आणि हा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. मात्र, त्या निवडणुकीत हा पक्ष जनता दल संयुक्तसोबत निवडणूक लढला होता. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डावे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad