TRP घोटाळा उघड; 'रिपब्लिक'ने पैसे देऊन रेटिंग वाढवले - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

08 October 2020

TRP घोटाळा उघड; 'रिपब्लिक'ने पैसे देऊन रेटिंग वाढवले


मुंबई - मुंबई पोलिसांनी खूप मोठा टीआरपी घोटाळा चव्हाट्यावर आणला आहे. यात दोन मराठी चॅनेल आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या 'रिपब्लिक टीव्ही' या वृत्तवाहिनीचाही सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती दिली.

मुंबई पोलिसांच्या तपासात टीआरपी रॅकेट उघडकीस आलं आहे. टीआरपी एजन्सीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात होते. यात पैसे देऊन रेटिंग वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी 'फक्त मराठी', 'बॉक्स सिनेमा'च्या चालकांना अटक करण्यात आली आहे. ८ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. 'रिपब्लिक टीव्ही ' या हिंदी व इंग्रजी चॅनेलचा चालकही या रॅकेटमध्ये असल्याचा संशय आहे. रिपब्लिकने पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवल्याचे पुरावे हाती लागत आहेत. विशिष्ट चॅनेल घरात लावण्यासाठी पैसे दिले गेल्याचेही तपासात आढळले आहे, असे परमबीर सिंग यांनी सांगितले.

बनावट टीआरपी रॅकेटमध्ये 'रिपब्लिक टीव्ही', 'फक्त मराठी', 'बॉक्स सिनेमा' हे तीन चॅनेल गुंतले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून पुढे येत आहे. आम्ही उपलब्ध पुराव्यांची पडताळणी करत आहोत. 'हंसा' ही एजन्सी टीआरपी रेटिंग वाढवण्यासाठी या चॅनेल्सना मदत करत होती, असेही सिंग यांनी सांगितले. याप्रकरणी आमची चौकशी सुरू असून रिपब्लिक टीव्हीचे प्रवर्तक आणि संचालक यांना लवकरच समन्स बजावण्यात येणार असल्याचेही सिंग यांनी नमूद केले.

Post Top Ad

test