Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

सुशांतची हत्या नसून आत्महत्या, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (AIIMS) अहवाल 



मुंबई - तब्बल 110 दिवसानंतर अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे.सुशांतची हत्या नसून त्याने आत्महत्या केली आहे, असा अहवाल दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) दिला. हा अहवाल 28 सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालात हत्येचा दावा पूर्णपणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले गेले आहे. सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती तयार केली गेली. 20 सप्टेंबर रोजी हे पथक आपला अहवाल सादर करणार होते. मात्र याला 8 दिवसांचा उशीर झाला. 28 सप्टेंबर रोजी एम्सने आपला अहवाल सीबीआयकडे सोपवला. माध्यमांतील वृत्तानुसार, एम्सच्या डॉक्टरांना व्हिसेरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळलेले नाही.

14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. त्याच्या मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. एम्सच्या पाच डॉक्टरांच्या समितीने या प्रकरणाचा पूर्ण तपास केला. सुशांतची हत्या झाली असावी असे म्हणता येणार नाही, असे डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनीही व्हिसेरा अहवाल प्रसिद्ध केला होता. सुशांतच्या पोस्टमार्टमनंतर व्हिसेरा तपासणीसाठी कलिना फोरेंसिक लॅबला देण्यात आला. प्रयोगशाळेने आपल्या अहवालात मृत अभिनेत्याच्या शरीरात कोणतेही संशयित रासायनिक किंवा विष सापडले नसल्याचे स्पष्ट केले होते.

या प्रकरणात सीबीआयला मदत करणा-या एम्सच्या पथकाने आपल्या अहवालात हत्येची शक्यता नाकारली आहे. वृत्तानुसार, एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी एका बातचीत म्हटले आहे की, सुशांतचे प्रकरण क्लियर कट आत्महत्येचे प्रकरण आहे. त्याची हत्या झाली नव्हती. मात्र, अद्याप याची अधिकृतपणे सीबीआयने पुष्टी केलेली नाही. या अहवालावर आता सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्ती हिने प्रतिक्रिया दिली आहे. फक्त दोन शब्दांमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. श्वेताने सुशांतचा फोटो शेअर करुन "आम्ही जिंकणार" असे म्हटले आहे. इतक्या महिन्यांपासून भावासाठी लढाई लढणाऱ्या श्वेताला आपल्या भावाला न्याय मिळेल असा विश्वास कायम आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणार्‍या मुंबईतील कुपर रुग्णालयाच्या डॉक्टरांना या अहवालात क्लीन चीट देण्यात आलेली नाही. सुशांतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. परंतु त्यांनी दिलेल्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित झाले होते. सुशांतच्या गळ्यावर मिळालेल्या जखमांचा अहवालात उल्लेख नव्हता. शिवाय त्याच्या मृत्यूची वेळ देखील त्यात नमूद करण्यात आलेली नव्हती. यानंतर सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसेच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom