Type Here to Get Search Results !

वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता : ऊर्जामंत्री


मुंबई : मुंबईत सोमवारी 12 ऑक्टोबरला वीज पुरवठा खंडित झाला होता. याप्रकरणी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं राज्याचे ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.

मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उनगरातील वीजपुरवठा 12 ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास पूर्णपणे खंडित झाला होता. या काळात अनेक महत्त्वाच्या सेवा कोलमडल्या. लोकल ट्रेन, सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्या. रुग्णालय, कोर्ट तसंचं ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला. यानंतर टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. याविषयी माध्यमांशी बोलताना नितीन राऊत यांनी काही जण ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, "मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं ही साधीसुधी बाब नाही आणि कोणी समजूही नये. काही लोक ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ऊर्जा मंत्री म्हणून या बाबतीत सगळ्या बाबींची पडताळणी करणं माझी जबाबदारी आहे. आज तांत्रिक चौकशी समिती स्थापन होईल. ही समिती ऑडिट करेल. त्याचा अहवाल एक आठवड्यात येईल. महावितरणच्या अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होणार आहे. कोणालाही सोडणार नाही." वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसंच या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर दुसरीकडे या घटनेची चौकशी करुन दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं होतं.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad