Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

सायन रुग्णालयात कोवॅक्सिन लसीच्या चाचणीला सुरुवात



मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोणा विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लस हाच एकमेव पर्याय आहे. कोरोनावरील लसीची चाचणी मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर रुग्णालयानंतर आता सायन रुग्णालयात ५ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या एथिक कमिटीची परवानगी मिळाल्यानंतर भारत बायोटेक कंपनीने विकसित केलेल्या 'कोवॅक्सिन' लसीच्या चाचणीला सुरुवात केल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ मोहन जोशी यांनी सांगितले.

चीनच्या हुवांग प्रांतातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरात झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखता यावा म्हणून जगभरातील देशांमधून लसीचा शोध लावला जात आहे. अमेरिकामधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने 'कोव्हीशिल्ड' लसीचा शोध लावला असून त्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. या चाचणी दरम्यान या लसीचा मानवावर काही दुःपरिणाम होतात याचा सध्या अभ्यास सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात त्याची चाचणी करण्यात सुरू आहे.

एकीकडे महापालिकेच्या केईएम आणि नायर रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू असतानाच पालिकेच्याच सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. सायन रुग्णालयात एक हजार स्वयंसेवकांवर चाचणी केली जाणार असून शनिवार ते आतापर्यंत १५ स्वयंसेवकांना लस तोचण्यात आल्याची माहिती डॉ मोहन जोशी यांनी दिली.

अशी दिली जाते लस -
भारत बायोटीकची कोवॅक्सिन ही लस दिल्यावर त्या स्वयंसेवकाला किमान अर्धा तास रुग्णालयात विश्रांती करण्यासाठी सांगितले जाते. त्यावेळी त्या स्वयंसेवकावर देखरेख ठेवण्यात येते. त्यानंतर काही त्रास होत नसल्यास त्यांना घरी पाठवण्यात येते. स्वयंसेवक घरी गेल्यानंतरही डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे डॉ. एन. अवध यांनी सांगितले. दरम्यान, भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सीन लस देण्याआधी स्वयंसेवकाच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. तसेच लस देण्याआधी लसीबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. यानंतर तो स्वयंसेवक तयार झाल्यास त्याची सही घेत लस दिली जाते, असेही त्यांनी सांगितले.

जेजे मध्येही कोवॅक्सिन -
जे.जे. रुग्णालयात १८६ स्वयंसेवकांना कोवॅक्सिन लसीच्या क्लिनिकल ट्रायलला राज्य सरकारच्या एथिक कमिटीने परवानगी दिल्यानंतर आतापर्यंत १८६ जणांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. आयसीएमआरच्या नियमांनुसार, प्रत्येक सेंटरमध्ये किमान हजार स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. शिवाय, प्रत्येक क्लिनिकल ट्रायलला विमा दिला गेला आहे. क्लिनिकल ट्रायल दरम्यान स्वयंसेवकांना होणारा किंवा झालेला त्रास पाहून एथिक कमिटी आणि डीसीजीआयची कमिटी त्यावर निर्णय देईल. किमान वर्षभर चालणारी ही प्रक्रिया आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर ने ही लस तयार केली अशी माहिती जे.जे. रुग्णालयातील कोवॅक्सीन क्लिनिकल ट्रायलचे सह अन्वेषक डॉ. दिनेश धोदी यांनी दिली. दरम्यान, कोवॅक्सीन लस दिलेल्या स्वयंसेवकांना कुठला त्रास होत आहे का, काही दुष्परिणाम होतोय का ? यावर बारकाईने डॉक्टरांची टीम लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom