Type Here to Get Search Results !

21 वर्षीय आर्या बनली देशातील सर्वांत तरुण महापौरकेरळ - केरळमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीनंतर एका 21 वर्षीय तरुणीने महापौरपदावर स्वतःचे नाव कोरत नवीन विक्रम रचला आहे. केरळची राजधानी तिरुअनंतपुरममधील आर्या राजेंद्रन ही 21 वर्षीय तरुणी देशातील सर्वात कमी वयाची महापौर बनली आहे. यासह आर्या हिने नवी मुंबईचे महापौर संजीव नाईक यांचा सर्वांत कमी वयाचे महापौर बनण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. नाईक 1995 साली वयाच्या 23 व्या वर्षी पहिल्यांदा महापौर बनले होते.

महापौर आर्या राजेंद्रन या माकप नेत्या असून त्यांनी 99 पैकी 54 मतांसह पदावर शिक्कामोर्तब केले. मुडवानमुगलमध्ये (तिरुअनंतपुरम) त्यांना जिल्हाधिकारी नवज्योत खोसा यांनी महापौरपदाची शपथ दिली. पक्षातर्फे जिल्हा व राज्य समितीने एकमताने आर्या यांची महापौर पदासाठी उमेदवारी मंजूर केली होती.

आर्या येथील ऑल सेंट्स कॉलेजमध्ये शिकणारी बीएस्सीची (गणित) दुसर्‍या वर्षाची विद्यार्थिनी आहे. शहर महापौरपदाची जबाबदारी स्वीकारण्याबरोबरच अभ्यासही सुरू ठेवणार असल्याचे तिने माध्यमांना सांगितले. तिने मराठमोळे नेते संजीव नाईक यांचा सर्वांत कमी वयाचे महापौर बनण्याचा विक्रम मोडीत काढला आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माकप) पी. के. राजू हे तिरुवनंतपुरम महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad