Type Here to Get Search Results !

मुंबईत काँग्रेसचा महापौर बसवल्यास राज्यात मुख्यमंत्रीही काँग्रेसचा असेल - बाळासाहेब थोरातमुंबई - काँग्रेसचा जनाधार शहरात कमी झाला आहे. शहरातील जागांमध्ये आपण कमी पडतो. यासाठी मुंबई महापालिकेत काँग्रेसचा महापौर बसवा. मुंबईत काँग्रेसचा महापौर बसला की राज्यात मुख्यमंत्रीही काँग्रेसचा बसवू, असे काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचा १३६ वा स्थापना दिवस आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, एकनाथ गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे भाई जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

मुंबईची आगळी वेगळी ओळख आहे. मुंबईत काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. याच मुंबईमधून सर्व खासदार काँग्रेसचे निवडून आले होते. आमदारही मोठ्या प्रमाणात निवडून आले होते. याची आठवण करून देत काँग्रेसपासून दूर गेलेल्या लोकांना पुन्हा काँग्रेसजवळ आणण्याचे काम करा. महापालिका ही पहिली परीक्षा आहे. यापुढे विधानसभा, लोकसभा निवडणुका आहेत. त्याच्याही परीक्षा द्यायच्या आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईच्या माध्यमातून काँग्रेसला देशात बळकट करण्याचे काम आपल्याला करावे लागेल. काँग्रेसला बळकट करण्यासाठी खांद्याला खांदा मिळवून काम करूया, असे मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad