Type Here to Get Search Results !

नव्या वर्षाचे स्वागत घरातच करा - महापौरमुंबई - कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळले नसून सद्यस्थितीत आपण नियंत्रण मिळविले आहे. अशा स्थितीत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणे योग्य नसून सर्वांनी घरीच आपल्या कुटुंबीयांसमवेत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करावे. तसेच उद्यापासून सुरू होणारे नूतन वर्ष सर्व मुंबईकर नागरिकांना आरोग्यदायी, सुख-समृद्धी, भरभराटीचे जावो, अशी सदिच्छा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सर्व मुंबईकर नागरिकांना दिल्या आहेत.

नवीन वर्षाचे स्वागत करताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आखून दिलेल्या मास्क लावणे, हातांची स्वच्छता ठेवणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच राज्यशासन, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच उपाहारगृहे रात्री ११ नंतरही विहित नियम पाळून उघडी ठेवण्यात येणार असून आवश्यक ती मागणी घरीच करावी, अशी सूचनाही महापौरांनी यानिमित्ताने केली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात मागील वर्ष गेले. नवीन वर्षात कोरोनावर लस लवकर उपलब्ध होईल, अशी आशा करूया. तसेच कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल अशी मला खात्री असल्याचे महापौरांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad