Type Here to Get Search Results !

मुंबईतील ड्रॅगन फ्लाय क्लबवर कारवाईमुंबई : मुंबईतील ड्रॅगन फ्लाय क्लबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान क्रिकेटपटू सुरेश रैना, हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान, गायक गुरु रंधावा उपस्थित होते. तर रॅपर बादशाहने यावेळी पळून जाण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आलं आहे. दरम्यान या कारवाईचं कारण समोर आलं आहे. नाईट कर्फ्यू असताना रात्री उशिरापर्यंत हा क्लब सुरु असल्याने कारवाई केल्याची माहिती मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

मुंबई एअरपोर्टजवळ असणाऱ्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर पोलिसांनी पहाटे तीनच्या सुमारास छापा टाकला. यावेळी या क्लबच्या ग्राहकांमध्ये अनेक सेलिब्रिटी असल्याची माहिती समोर आली असून, यामध्ये 34 ग्राहकांसह 7 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ग्राहकांमध्ये सुरेश रैना, गुरु रंधावा, सुझान खान, बादशाह यांसारखे प्रसिद्धी सेलिब्रिटी असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या सेलिब्रिटींना पोलिसांनी समज देऊन सोडल्याचं कळतं.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad