राज्यात 3.160 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ. 64 रुग्णांचा मृत्यू - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

05 January 2021

राज्यात 3.160 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ. 64 रुग्णांचा मृत्यूमुंबई - मंगळवारी (दि. 5 जाने.) राज्यात 3 हजार 160 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 लाख 50 हजार 171 वर पोहोचला आहे. राज्यात आज (मंगळवार) 64 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 49 हजार 759 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.55 टक्के एवढा आहे. राज्यात आज (दि. 5 जाने.) एकूण 49 हजार 67 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 2 हजार 828 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण 18 लाख 50 हजार 189 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.87 टक्के एवढे झाले आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 30 लाख 61 हजार 976 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 19 लाख 50 हजार 171 नमुने म्हणजेच 14.93 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 41 हजार 557 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण 49 हजार 67 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Post Top Ad

test