मुंबईत शुक्रवारी तीन ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

07 January 2021

मुंबईत शुक्रवारी तीन ठिकाणी कोरोना लसीकरणासाठी ड्राय रनमुंबई - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शुक्रवारी (दि. ८ जानेवारी) महाराष्ट्रातील ३० जिल्हे व २५ महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणाची सराव फेरी राबविण्यात येणार आहे. यानुसार मुंबई महापालिकेद्वारे राजावाडी, कूपर रुग्णालयात तसेच बिकेसी येथील कोविड केंद्र अशा तीन ठिकाणी सराव फेरी घेण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.

कोविन अप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे. कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी, तपासणी, प्रत्यक्ष लसीकरण सुरू करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सूचना तयार करणे, लसीकरण मोहिमेतील सर्व स्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे यासाठी सराव फेरी घेतली जाते, असे गोमारे म्हणाल्या.

या मोहिमेची पूर्वतयारी करण्यात आली असून चाचणी लाभार्थ्यांची निवड करून कोविन अ‌ॅपमध्ये लसीकरण सत्र तयार करणे आणि त्याचे मॅपींग करणे, चाचणी लाभार्थ्यांची माहिती कोवीन पोर्टलवर भरणे, लाभार्थी व आरोग्य सेविकेंचे सत्र स्थळ निश्चित करणे, लस वाटप करणे व शितसाखळी केंद्राला कळविणे, आरोग्य सेविकेला सत्राचा दिवस व वेळ कळविणे, लसीकरण अधिकारी १ ते ४ आणि पर्यवेक्षक यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून त्यांना त्याची माहिती देणे आदी पूर्वतयारी करण्यात आली, असे गोमारे यांनी सांगितले.

सराव फेरी चाचणीत लाभार्थ्यांचे निरीक्षण करून एका केंद्रावर २५ लाभार्थ्यांना लसीकरण केले जाईल. लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अ‌ॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले जाईल. त्यानंतर कोवीन अ‌ॅप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केल्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोविन ॲपमध्ये करण्यात येईल. कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करावी. मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर राखणे या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Post Top Ad

test