मुंबईत २४ तासांत १६९ कावळे, कबुतरे मेल्याच्या तक्रारी

Anonymous
0
मुंबई - मुंबईत मृत कावळे, कबुतरांच्या तक्रारीत वाढ झाली असून २४ तासांत पालिकेच्या हेल्पलाईनवर १६९ तक्रारी नोंद झाल्या आहेत. बर्डफ्लूच्या पार्श्वभूमीवर मृत पक्ष्यांची माहिती देवनार पशूवधगृहात पाठवण्यात आली असून पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कावळे व कबुतरांच्या मृत्यूनंतर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

बर्डफ्लूच्या पार्श्वभूमीवर मृत कावळे, कबुतरे आदी पक्षांबाबत पालिकेला माहिती देण्याबाबत प्रशासनाने आवाहन केले होते. त्यानंतर मंगळवारपासून पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातील फोन खणखणू लागले आहेत. मागील २४ तासांत म्हणजे मंगळवारी सकाळी ७ ते बुधवारी सकाळी सात वाजेपर्यंत १६९ कावळे, कबुतरे मृत झाल्याच्या तक्रारी हेल्पलाईनवर नोंद झाल्या आहेत.

चेंबूरच्या टाटा कॉलनीत कावळे मृत झाल्याचे आढळल्यानंतर पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मृत पक्ष्यांची माहिती देण्यासाठी प्रशासनाशी संपर्क करा, असे आवाहन पालिकेने केले होते. त्यानंतर २४ तासांतच मुंबईत कावळे, कबुतरे मृत झाल्याच्या १६९ तक्रारी पालिकेच्या '१९१६' या हेल्पलाईनवर नोंद झाल्या. या सर्व तक्रारीबाबतची माहिती देवनार येथील पशूवध गृहात पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)