Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी ३७१ वर



मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येते आहे. १५ दिवसांपूर्वी ३५९ दिवसांवर असलेला रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता ३७१ वर दिवसांवर पोहचला आहे. बरे होणा-या रुग्णांचा दरही ९३ टक्के झाला आहे. 

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना दिवाळीत झालेल्या गर्दीमुळे वाढला होता. रोजची साडेचारशे - पाचशे पर्यंत आलेली रुग्णसंख्या दुप्पट झाली होती. त्यानंतर वर्ष सरता सरता परदेशातील नव्या कोरोनाच्या प्रकार समोर आल्यानंतर पुन्हा मुंबईकरांची चिंता वाढली होती. मात्र मुंबई महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. दिवाळीपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ३०० च्यावर पोहचला होता. मात्र २२ नोव्हेंबरला हा कालावधी घसरून २५८ दिवसांवर आला. तर २६ नोव्हेंबरला रुग्ण दुपटीचा कालावधी आणखी घसरून १९६ वर आला होता. मात्र त्यानंतर २ डिसेंबरपर्यंत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून २२२ दिवसांवर पोहचला. २४ डिसेंबरला रुग्ण दुपटीचा कालावधी आणखी वाढत गेला. १३ जानेवारीपर्यंत म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी ३७१ वर पोहचला आहे.

६ जानेवारी ते १२ जानेवारीपर्यंत कोरोना रुग्ण वाढीचा दर ०.२१ टक्के झाला आहे. १२ जानेवारी २०२१ पर्यंत एकूण चाचण्या २५,३३,६४० चाचण्यांची नोंद झाली. एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३००४७१ झाली आहे. यातील बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या २८०८५३ आहे. तर अॅक्टीव रुग्ण ७५२५ असून ते विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. कोरोना रोखण्यासाठी पालिकेकडून पुरेसा बेड, कोरोना सेंटर, चाचण्या, उपचार पद्धती आदी प्रभावीपणे राबवली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom