मुंबईत कोरोनाचे ५१६ नवे रुग्ण, ३ रुग्णांचा मृत्यू, सर्वात कमी मृतांची आज नोंद

Anonymous
0


मुंबई - आज (सोमवारी) मुंबईत ५१६ नवे रुग्ण आढळून आले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यात सर्वात कमी मृतांची आज नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ९४ हजार ९८५ वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा ११ हजार १३८ वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज ५७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा २ लाख ७६ हजार ३४ वर गेला आहे. सध्या मुंबईत ६ हजार ९४३ सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३ टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५७, दिवस तर सरासरी दर ०.२१ टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या २१५ चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच २ हजार १५८ इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी २४ लाख ४ हजार १चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)