
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 365, दिवस तर सरासरी दर 0.21 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 195 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 1 हजार 985 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 24 लाख 30 हजार 972 चाचण्या करण्यात आल्या आहेत.